ज्येष्ठ गायक पं. अजितकुमार कडकडे
त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या […]