ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी
आपल्या हुकमी अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे आज ६ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता. भारत सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित […]