किचन क्लिनीक – तिळ
आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया. तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून तीळ उष्ण असतात.ते स्निग्ध,पचायला जड असून वातनाशक व कफ पित्त वाढविंणारे असतात. तीळ हे दातांना बळकट करतात,बाळंतीण स्त्रीचे दुध वाढवतात व […]