रजनीकांत
रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात […]