पंडितराव नगरकर
पंडितराव नगरकर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली […]