कोरडा खोकला
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला. कारणे श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो. लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो. कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा […]