आघाडीच्या लोकप्रिय गायिका मंजूषा कुलकर्णी-पाटील
मंजूषा कुलकर्णी-पाटील यांची तब्बल दोन दशकांहून अधिक सांगीतिक कारकिर्द आहे. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९७१ रोजी सांगली येथे झाला. थेट काळजाला भिडणारा स्वर, लांब पल्ला असणाऱ्या आणि दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत, सुरांवरची घट्ट पकड, गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी आणि त्यामागचा विचार नेमका पोहोचवण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे मंजूषा पाटील या सातत्याने देशभरातील रसिकांची दाद घेत आल्या आहेत. मुर्ती […]