नवीन लेखन...

सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. […]

निरूपा रॉय

बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत […]

उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, खलनायक सदाशिव अमरापूरकर

अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी – मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. “हॅंडस्‌ अप’, हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले […]

दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, किशोर कुमार

किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्याकस किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा […]

फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी […]

जेष्ठ कलाकार दादामुनी उर्फ अशोक कुमार

१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर […]

तीन मूर्तींचे रहस्य

भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे ‘नवरत्न’ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे. एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती […]

मराठी कवी, शाहीर अनंत फंदी

उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण. यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा […]

अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी

मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि […]

नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता

अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता […]

1 33 34 35 36 37 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..