नवीन लेखन...

मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर

अगं नाच नाच राधे, सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा, कुणीतरी येणार येणार ग, उठा उठा हो सकळीक ” अशा असंख्य गाण्यांना आपल्या आवाजाने सरताज चढविणाऱ्या मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा जन्म ४ नोव्हेंबर रोजी झाला. उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. ‘सत्यम शिवम सुंदरा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली’ असो, की बहिणाबाईंची – […]

संकटातही वेळेचा सदुपयोग

प्रसिद्ध इतिहासकार अर्नार्ड टॉयन्बी एकदा परदेशात व्याख्यान देण्यासाठी गेले होते. आपला दौरा संपवून ते मायभूमीला जाण्यासाठी परत निघाले. बोटीचा प्रवास होता त्यामुळे वेळ लागणार होता. त्याच बोटीतून एक धर्मोपदेशकही प्रवास करीत होते. त्यांना समजले की टॉयम्बीदेखील याच बोटीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून टॉयन्बीची ओळख करून घेतली. आणि मग उभयतांमध्ये विविध प्रश्रांवर चांगलीच साधकबाधक चर्चा झाली. […]

मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी

निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी जन्म १४ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची […]

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले; आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते…जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, … अशा अनेक कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य गाजवणारे कवी म्हणजे नारायण सुर्वे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर […]

जोडी विल्यम्सने यशस्वी केलेली ‘बॅन लॅण्डमाइन्स’ चळवळ

मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली. […]

‘नोबेल’चे अज्ञात मानकरी

एखाद्याला पडलेल्या प्रश्नातून किंवा सुचलेल्या कल्पनेतूनच शोध लागतात. आजच्या काळात जसे आपल्या विविध गरजा किंवा समस्या शास्त्रज्ञांना नवनवी तंत्रे विकसित करायला भाग पडतात, तशाच गरजांमधून खरेतर लाखो वर्षांपूर्वी आदिमानवांनीही शोध लावण्यास सुरुवात केली. […]

मसाल्यांनी वाढवा सौंदर्य

आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे. चेहऱ्यावरची मुरुम त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याबद्दल काही खास टिप्स. दालचिनी : दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारत दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊं शकतो. याची पेस्ट तयार करून […]

निर्भयतेने मृत्यूवर मात

कामावरील निष्ठा, चातुर्य आणि निर्भयता जवळ असली तर वेळप्रसंगी मृत्युसारख्या संकटावरदेखील मात करून मृत्यू टाळता येऊ शकतो. या संदर्भात मोगल बादशहा जहांगीर याच्यासंबंधीची एक हकिकत. […]

काडी इतकीही चूक नाही

एकदा एका सरदाराने नाना फडणिसांना भोजनाचे निमंत्रण दिले. नानांना खूप करण्यासाठी त्या सरदारने भोजनाचा खास राजेशाही थाट ठेवला. आपण सरदार असल्यामुळे त्या कार्यक्रमात कसलीही कसर ठेवायची नाही हे त्यांनी आधीच ठरविले होते. […]

बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ  मनीष घटक त्याच्या वेळ मूलगामी लेखक आणि […]

1 37 38 39 40 41 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..