नवीन लेखन...

ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर

रॉयल अॅकॅडमी ऑप ड्रॅमॅटिक आर्ट मधून रॉजर मूर यांनी अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. ब्रिटीश अभिनेते रॉजर मूर यांनी १९५४ साली आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरूवात केली. त्याआधी काही जाहिरांतीसाठी मॉडेलिंगचे काम केले. बॉण्डपटातील भूमिकेमुळे त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला होता. रॉजर मूर यांनी सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजर […]

ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस

रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. ‘घरोघरी […]

दिग्दर्शक अभिनेते सतीश पुळेकर

सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. १९७६ मध्ये सतीश पुळेकर यांची चांगुणा’ नाटकातून कारकिर्दीला सुरवात झाली. यात सतीश पुळेकर आणि रोहिणी हट्टंगडीनं काम केलं होतं आणि या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. ‘आविष्कार’ या संस्थेकडून हे नाटक रंगमंचावर […]

जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार

जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला. पं. डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे. खरेतर पंडितजींचे घराणे गायकाचे. त्यांचे वडील केशवराव आणि गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर हे गुरुबंधु. त्यामुळे पंडितजींकडे गायनाचा वारसा परंपरेने आलाच होता. मात्र पंडितजी अवघे सहा वर्षांचे असतानाच केशवरावांचे निधन झाले. परिणामी, त्यांच्याकडून गाण्याची संथा […]

शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकरसिंग

शंकर यांचे पूर्ण नाव शंकरसिंग रघुवंशी. त्यांचा जन्म १५ आक्टोबर १९२२ रोजी झाला. शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम […]

ड्रीमगर्ल हेमामालिनी

हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते कि त्यांच्यात […]

वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे

झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८९० रोजी झाला. […]

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अदिती सारंगधर

अदिती सारंगधर यांना त्यांच्या करीयरच्या सुरवातीला कांचन अधिकारी यांनी त्यांच्या “दामिनी” या मालिकेत संधी दिली . तिचा जन्म १६ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला. “दामिनी” नंतर “वादळवाट” या मालिकेतून त्यांना ओळख व लोकप्रियता मिळाली. स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली. राजन ताम्हने दिग्दर्शित “प्रपोजल” हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरत आहे. […]

सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र – फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. […]

अभिनेत्री स्मिता पाटील

रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली […]

1 38 39 40 41 42 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..