नवीन लेखन...

कायम मनीं वसावा विठ्ठल

ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल कायम मनीं वसावा विठ्ठल  ।। नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा मजला केवळ ठावा विठ्ठल  ।। जगतीं ऊन नि खड्डे काटे वाटेवरी विसावा विठ्ठल  ।। अंध पुरा मी, मार्ग दिसेना तडफड ही – कवळावा विठ्ठल  ।। थांबायाचें जेव्हां हृदया तेव्हां मुखीं असावा विठ्ठल  ।। सुभाष स. नाईक Subhash S. Naik

मराठी चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी

मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून  प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७  रोजी मुंबईत झाला. स्वप्नील जोशीने वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत […]

वाट पंढरिची पावन ही

पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई वाट पंढरिची पावन ही  ।। चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं  ।। सोडुन आलो मागुती  घर, कुटुंबां जरी चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।। प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास […]

पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

पुण्यातील  नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच […]

एन् डी स्टुडिओ: प्रतिभावंताचे सत्य-स्वप्न !

प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्‍या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओंमध्ये या स्टुडिओची गणना होते. […]

शेतकरी आणि राजा

गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे. […]

आज कार्तिक शुद्ध एकादशी….!

आज कार्तिकी एकादशी. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू पंचांग नुसार कार्तिक मासे शुक्लपक्षी येणाऱ्या एकादशीला, म्हणजेच दिवाळीतल्या भाऊबीज सणानंतर बरोबर दहाव्या दिवशी पंढरीच्या विठ्ठल नामे आस्था ठेवून त्याच्याच जयघोषात, उपासांतर्गत प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावयाचा सण म्हणजेच आज ३१ आक्टोबर ला अखंड भारतात साजरी होणारी “कार्तिकी एकादशी” होय. खरतर हिंदवी वर्षाच्या प्रत्येक मासी दोन एकादशी येतात.आणि […]

मराठी गायक, संगीतकार राम फाटक

मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच […]

1 40 41 42 43 44 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..