दुष्टाचा मृत्यु
सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली […]