नवीन लेखन...

नैराश्यावर बोलू काही

आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!! […]

विझलेल्या दिव्याची महती

अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल. […]

न्याय देवते

कुठे तु गेलीस न्याय देवते,  जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग,  दाद आम्हाला या जीवनी  ।। परिस्थितीचे पडता फेरे,  गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती,  सत्य लपवितो कुणीतरी  ।। दबाव येता चोहबाजूनी,  मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता,  मनी विरताती, येती जशी  ।। बळी कुणाच्या पडली तू […]

आली दिवाळी – वसुबारस

वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..! […]

समज

आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म […]

प्रतिभावंत कवी, तत्त्वचिंतक विं.दा.करंदीकर

विंदा करंदीकर हे धालवली खारेपाटण ता. देवगड गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी, जेष्ठ लेखक, अभ्यासू आणि जाणकार समीक्षक, बाल नाटककार, संस्कृत आणि मराठी वाङ्‌मय गाढे अभ्यासक .एक चोखंदळ वाचक, विध्यार्त्यांचे मार्गदर्शक. असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व. विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो..! […]

आयुर्वेदाचे ‘नोबेल’ कनेक्शन

रोसबाश, यंग, हॉल या तीन शास्त्रज्ञांना यावेळचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा संशोधनाचा विषय होता; जैविक घड्याळ म्हणजेच biological clock. आपल्या शरीरातील सर्व क्रिया/ चयापचय होण्यामागे एक नैसर्गिक घड्याळ कार्य करत असते; ही मूलतः आयुर्वेदीय ग्रंथांत आलेली संकल्पना आहे. […]

कथिलाचं पाणी….सावधान!!

सध्या ‘कथिलाचं पाणी’ या नावाने व्हॉटस्अप वर एक संदेश फिरतोय. काहींनी याबाबत मार्गदर्शन करा असे आवर्जून विचारल्याने लिहित आहे. या संदेशाकडे आपल्याला आयुर्वेद व आधुनिक विज्ञान अशा दोन्ही बाजुंनी पहावं लागेल. […]

आली दिवाळी..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत– “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी” […]

‘शतकातला श्रेष्ठ कलावंत, महानायक, अंग्री यंग मॅन – “अमिताभ बच्चन” !

आज महानायक मा.अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. त्यांचा जन्म. ११ ऑक्टोबर १९४२. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात. ‘शतकातला श्रेष्ठ कलावंत’ हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत […]

1 45 46 47 48 49 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..