नवीन लेखन...

बस तारीख पे तारीख !

पुरोगामी महाराष्ट्राला सुन्न करून सोडणारी एक बलात्काराची भीषण घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली .अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्दी गावात एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी पाशवी अत्याचार केले गेले. शरीराला पिडा देण्यापासून तर सरळ जीव घेण्यापर्यंतच्या पिशाच्च वृत्तीचा परिचय आला.घटनेनंतर कोपर्दी व आसपासच्या लोकांनी तीव्र निदर्शने केली .संप झाला.बंद झाले.सम्पूर्ण महाराष्ट्रीय समाजाला  तीव्र वेदना झाल्या .त्याचे पडसाद विधानसभा हादरवन्या पर्यंत […]

काळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’

दक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली! यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर. […]

कोण तू ?

मला ओळ्खल्याचा दावा तिनेही नाही केला जिच्या मी प्रेमात पडलो… माझे डोळे तिलाही नाही वाचता आले जिच्या प्रेमात मी रडलो… माझ्या हृदयातील धकधक मी कधीच नाही तिला ऐकवत हसलो… जगासाठी जगता जगता मी केव्हातरी तिच्यासाठी स्वार्थाने जगायला शिकलो… दुरूनच तिचा आंनद पाहून आंनदी होत आनंदाने जगत राहिलो… एकाकी काल्पनिक त्या क्षितिजावर तिची वाट पाहात प्रेमवेड्यासारखा मी […]

म्यानमारच्या नेत्या आंग सान सूची

म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो. 72 वर्षांच्या सू ची यांचे आयुष्य अनेकविध घटनांनी व चढउतारांनी भरलेले आहे. त्यापैकी महत्त्वाच्या घडामोडींमधून त्यांचा जीवनप्रवास समजू शकेल. आंग सान सू ची यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हटले जाते. क्रांतीकारी वृत्तीचे आंग सान […]

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती .. […]

सैनिकांचे “सरंबळ”- एक शुरांचं गाव !

“शहिदांचे गाव” म्हणून प्रसिद्ध असलेला कुडाळ तालुक्यातील सरंबळ हे माझं गाव. १९१४ साली झालेल्या युद्धामध्ये गावातील ५२ सैनिकांपैकी सात सैनिक शहीद झाले. “लढवय्यांचे गाव” म्हणूनही या गावाची ओळख आहे. त्यांच्या स्मरणार्थ या गावामध्ये रणस्तंभ उभारण्यात आला आहे. […]

जाणता

आता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता… लेखक – निलेश बामणे […]

परावलंबी

जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]

मृत्युंजयकार शिवाजी सावंत

“शिवाजी सावंत” हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच “मृत्युंजयकार” सावंत म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. […]

मै सूर्य हूॅं..

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!! […]

1 46 47 48 49 50 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..