सप्तपर्ण/सातविण
हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते […]