‘नाथ हा माझा’ – कांचन काशिनाथ घाणेकर
डॉ. काशीनाथ घाणेकर! एक कलंदर व्यक्तीमत्वाचा मनस्वी कलावंत! त्याच्या देखण्या रूपानं, स्वत:ला झोकून देऊन केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना विलक्षण मोहिनी घातली होती. पंचवीस वर्षे प्रेक्षकांना रिझवणार्या या कलावंताचं पारदर्शी व्यक्तीचित्रं या पुस्तकात कांचन घाणेकर यांनी चितारलं आहे. त्यात त्यांच्या बेभान, बेदरकार, व्यसनाधीन वृत्तीसह सार्या गुणदोषांचे, प्रेमप्रकरणांचे, नाट्यप्रवासाचे निखळ रंग उमटले आहेत. एका कलावंताचे कौटुंबिक, मानसिक, कलात्मक जीवन चितारणारे रसाळ चरित्र. […]