नवीन लेखन...

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]

पुणे भारत गायन समाज

पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू ” पुणे भारत गायन समाज ” आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत […]

उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी

सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, […]

हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर

सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव […]

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग एक

आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन ! […]

जरट्रड बेले एलियन – दुःखातून प्रेरणा

रसायनशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या जरट्रड बेले एलियन हिने कर्करोगावर उपाय शोधून काढला. तसेच हृदयविकार व पोटातील वायुविकारासंबंधी महत्त्वाचे संशोधन करून त्यासंबंधीची औषधे विकसित केली. त्याबद्दलच तिला १९८८ मध्ये शरीर-विज्ञानासंबंधीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. […]

मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या […]

प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र

शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी […]

गायक जयवंत कुलकर्णी

आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात […]

1 77 78 79 80 81 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..