जेष्ठ नाट्यकर्मी व नाटककार सत्यदेव दुबे
सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. लहानपणी त्यांच्यावर […]