नवीन लेखन...

जाळी

धागा धागा विणून,  केली तयार जाळी गोलाकार नि बहुकोनी घरे,  पडली निर निराळी….१, स्थिर सुबक घरे,  जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव,  न दिसे कुणा कोठे….२, तुटेल फूटेल तरी,  सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३, जगे तो अभिमानानें,  मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश,  झेलीत होती त्याची पाठ….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

पाषाणाच्या देवा

हादरून गेलो मनात पूरता,  ऐकून त्याची करूण कहानी केवळ एका दु:खी जीवाने,  हृदय दाटूनी आणीले पाणी असंख्य सारे जगांत येथे,  प्रत्येकाचे दु:ख निराळे सहन करिल का भार येवढा,  ऐकूनी घेता कुणी सगळे सर्व दुखांचा पडता डोंगर,  काळीज त्याचे जाईल फाटूनी कसाही असो निर्दयी कठोर,  आघात होता जाईल पिळवटूनी मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां […]

भक्ष्य

नदिकाठच्या कपारीमध्ये,   बेडूक बसला दबा धरूनी उडणाऱ्या त्या माशी वरते,  लक्ष सारे केंद्रीत करूनी…१, नजीक येवूनी त्या माशीचे,  भक्ष त्याने करूनी टाकले परि दुर्दैव त्याचे बघा कसे,  सर्पानेही त्यास पकडले…२, बेडूक गिळूनी सर्प चालला,  हलके हलके वनामधूनी झेप मारूनी आकाशी नेले,   घारीने त्याला चोचित धरूनी…३, ‘भक्ष्य बनने’ दुजा करिता,   मृत्यूची ही चालते श्रृखंला जनक असता तोच […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

लक्षवेधी सूचना…

कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]

श्रावण सरी….!!

|| हरी ॐ || आल्या आल्या श्रावण सरी, अवचित करिती चिंब परी ! उन पावसाच्या खेळ हा, सप्तरंगी पडदया आड हा ! रत्यांवर हिरव्या पानांचा सडा, दिसतो जसा हिरवा सरडा ! सख्या निघाल्या खेळाया ह्या, जमवून बाहुलीचे लग्न त्या ! रानीवनी मुक्त हिंडती ! लग्नासाठी जागा निवडती ! जंगलातील रस्ता निसरडा ! तरी नसे मना मुरडा […]

अभिनेत्री, पॉप गायिका मडोना

मडोना यांचे पूर्ण नाव मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने. मडोना मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका, फॅशन डिझायनर वगैरे होईल असं कुणाला वाटलं नसेल. […]

भावकवी कृ.ब. निकुंब

एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते. कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. […]

शब्द, अक्षर, भाषा : पुन्हां चारोळी, मुक्तक

कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें  हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ;  पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ […]

काजोल

सध्याच्या् काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत झाला. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच […]

1 89 90 91 92 93 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..