नवीन लेखन...

मी तिथेच तुमची वाट पाहतोय…

त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते, तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये.. अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता, तो आजही विटेवरून उतरत नाहीये.. अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. त्याने तेव्हाही गार्‍हाणी ऐकली नव्हती तो आजही गार्‍हाणी ऐकत नाहीये.. अन् माळकरी टोपीवाल्यांची आषाढी […]

ब्राम्ही

आपल्या सर्वांच्या परिचयाची ब्राम्ही,तिचे कार्य मेंदुवर होते व बुद्धि व स्मरणशक्ती वाढवायला हिचा उपयोग होतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे.तरी तिचे अजुन काही उपयोग आहेत का ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.चला तर मग ब्राम्हीची माहिती पुन्हा नव्याने जाणून घेऊ. ब्राम्हीचे जमिनीवर पसरणारे क्षुप असते.ह्याची पाने अखंडधार युक्त व मांसल असतात.ती मऊ व गुळगुळीत असतात.तसेच […]

जुळे

दोघे मिळून आलां हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। कुणाचे वर्म काढू नये कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये. बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल […]

सत्तरीचा ढोल

स्वातंत्त्र्यदिनानिमित्त ढम ढमा ढम ढोल वाजवा ढोल ढम ढमा गा सत्तरीचे बोल ।।   ढम ढमा सत्तरी हेंच अत्तर हिनें मनांवर केला हल्लाबोल ।।   ढम ढमा ढम सत्तेचाळिसला देशाला स्वातंत्र्य मिळे अनमोल ।।   ढम ढमा त्या स्वातंत्र्यासाठी कितिकांनी प्राणांचें दिधलें मोल  ।।   ढम ढमा ढम दशकांनी दो-तीन आणिबाणिची अंधारी झांकोळ  ।।   ढम […]

घोषणा

स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वतंत्र-भारत सत्तरीचा अन् मीही सत्तरीचा दोघांचें वय एकच .   १   मी म्हातारा झालो पण देशाचें लोकतंत्र अजून बाल्यावस्थेतच आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात सत्तर वर्षें ती काय !   २   माझ्यासारख्या अनेकांना हा देश पुरून उरेल. माझ्यासारख्या अनेकांना गाडून, ‘पुरून’, हा देश उरेल ?   ३   आम्ही तर देशासाठी कांहीं पुण्यकर्म केलें नाहीं म्हणा […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग वीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सव्वीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आई तेच सांगतेय, जे आयुर्वेदातील ग्रंथकार सांगत आहेत फक्त काळाचा आणि त्यामुळे शब्दांचा फरक पडलाय एवढंच. संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, […]

प्रसिद्ध गीतकार इन्दीवर

गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट ‘पारसमणि’ मधील इन्दीवर यांची गाणी गाजली. निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. ‘उपकार’ मधील “क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या…” […]

बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री राखी

राखी म्हणताच रसिकांच्या एका पिढीला घाऱ्या डोळ्यांची, फारशी टामटूम न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. राजश्री प्रॉडक्शनच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवनमृत्यू’ हा राखी यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ […]

कतक/केवडा

।। विनायकाय नम: केतकीपत्रं समर्पयामि।। केवड्याचे बन हे जंगलात पाण्याच्या जवळपास आढळतात.ह्याचा वास सापांना आवडतो अशी मान्यता आहे.ह्याचे ३-४ मीटर उंचीचे गुल्माकृती बेट असते.काण्ड वाकडे अनेक शाखा प्रशाखायुक्त असते.त्यापासून निघणारे अंकुर वडा प्रमाणे जमिनीत घुसतात. पाने १-२ सेंमी लांब,सरळ वाढतात व टोकाकडे खाली झुकलेले स्निग्ध असतात.कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळे सुगंधी,टोकदार,तीक्ष्ण दंतूर कडा असलेले असते.फुल […]

1 91 92 93 94 95 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..