नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग वीस

संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। शब्दाने शब्द वाढवू नये. अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो. रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल. ही जगाची रिती […]

मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल […]

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून […]

फिरते राधा धुंडित मधुवन

( कृष्णजन्माष्टमी व गोपालकाला यानिमित्त) आतुर होउन, शोधित मोहन, फिरते राधा धुंडित मधुवन पडतां कानीं वेणूवादन, भान हरपलें, मोहरलें मन  ।। केशकलापीं पुष्पें गंधित धुंद नाचते वेणी मंडित पदिचें नूपुर कटी मेखला करिंचे कंकण करती गायन ।। चंद्रकोर उजळिते ललाटा नथ ऐटीनें चुंबी ओठां हलतें हलकें, हलतां झळके, कानीं झुलणारे आभूषण   ।। काजळ खुलवी नयन टपोरे […]

ऊठ ऊठ रे शामसुंदरा

(कृष्णजन्माष्टमीनिमित्त) ऊठ ऊठ रे शामसुंदरा, लपली कधिच निशा अरुणकिरणकंचनकुसुमांनी सजली पूर्वदिशा   ।। कधिच प्रहर रात्रीचा सरला नच लवलेश तमाचा उरला दिवाकराची द्याया वर्दी, आली कधिच उषा  ।। कधीपासुनी अवतीभंवती वृक्षलतांवर खग चिंवचिंवती कधीच तेजस स्पर्श जाहला गोवर्धनकळसा ।। कमलदलीं मधुकर गुणगुणती गोठ्यांमधिं घंटा किणकिणती गात अंगणीं सडा शिंपती सस्मित गोपस्नुषा  ।। पय प्राशत गोपबाल सारे दुग्धपान […]

मरू/मरवा

।।भालचंद्राय नम: मरूपत्रं समर्पयामि।। हे गुल्म वितभर उंच वाढते.ह्याची पाने मेथीच्या पानांसारखी असतात व त्यास चांगला वास येतो.ह्याला तुरे येतात. ह्याची चव तिखट,कडू असून हा उष्ण गुणाचा असतो व कोरडा आणी तीक्ष्ण असतो.हा शरीरातील कफपित्त कमी करतो. मरवाचा उपयोग अरूची,सुज,दमा,कृमी,पोट फुगी,मल बध्दता,त्वचा रोग,भुक न लागणे अशा अनेक तक्रारींवर होतो. (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग एकोणीस

उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये. या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण ! […]

कृष्णाष्टमी

भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा
[…]

एक “कृष्णचिन्ह ” !

हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते […]

1 92 93 94 95 96 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..