पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११
निष्कर्ष आणि समारोप : मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक (a must) वाटत नाहींत […]