कोकणची मुंबई का नको? काही कारणं
माझा आक्षेप आहे तो मुंबईचं माॅडेल डोळ्यासमोर ठेवण्याला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तिची अंतर्गत परिस्थिती पार मोडकळीला आलेली आहे. बाहेरून स्वर्ग दिसणारी मुंबई फक्त २०-२५ टक्के धनिकांची आहे आणि ते ही बाहरून मुंबईत आलेल्यांची. मुंबईत वाहतुकीचे, पर्यावरणाचे, निवासाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मुंबईतील बहुसंख्य स्थानिक कधीच महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर गेलेले आहेत. मुंबईतले उद्योग कधीच उठले आहेत आणि त्याजागी सेवा उद्योग आलेले आहेत आणि तेथे बहुसंख्य बाहेरून आलेले लोक काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतल्या गिरण्या, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथील स्थानिक माणूस मुंबईतच उपरा झालेला असून तिथेच कुठेतरी वाॅचमनची नोकरी करत आहे. ज्या उद्योगांमुळे मुंबई जगभरात प्रख्यात झाली, ते उद्योग प्रदुषणाचं कारण देत मुंबईबाहेर गेलेले आहेत. साधारण २०-२५ वर्षांपू्वी सोन्याचा धुर निघणारा, मुंबईचं इंडस्ट्रीयल हार्ट असणारा सीएसटी रोड आणि ठाणे-बेलापूर रोड आज मोठमोठाले हाऊसिंग काॅम्प्लेक्सेस आणि आयटी-बिपीओ कंपन्यांनी भरून गेलाय. मुंबईची औद्योगिक नगरी बनवणारे सर्व उद्योग मुंबबाहेर जाण्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, हे उद्योग अभे असलेल्या जमिनिंना आलेला सोन्या-रुप्याचा भाव आणि दुसरं म्हणजे ते करत असलेलं प्रदुषण. […]