गायिका अंजनीबाई मालपेकर
अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी […]