संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि […]