श्री महाकवि वाल्मिकी
नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।। प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।। रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।। अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।। महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।। प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।। सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।। महान काव्य रचना […]