विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर यांचे वडील हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्याभारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. […]