‘गीत-रामायणा’चें हिंदी भाषांतर करतांना
गीत रामायणाचें बर्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलें आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती. त्यामुळे, त्याचें हिंदी भाषांतर आधीच झालेलें असूं शकेल याची मला कल्पना होती (आणि, तशी परिस्थिती खरोखरच होती, हें नंतर मला समजलेंच). मात्र, मी त्यावर मोहित झालेलो असल्यानें, आपण हें भाषांतर करायचेंच असें मी ठरवलें. यात ‘स्वान्त:सुखाय’ अशा आनंदाचाच भाग होता ; व्यावसायिक कांहींही नव्हतें (आजही नाहीं ). […]