कृष्णधवल सिनेमा काळातील अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून
टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय […]