श्री गणेश जन्मकथा
श्री गणेशा नमुनी तुला नंतर नमितो कुलस्वामिनीला मातापूरवासिनी रेणूकेला कृपा प्रसादे ।१। तुझा महिमा असे थोर दुःख नष्ट होती सत्वर कृपा करिसी ज्याचेवर पावन होत असे ।२। गणेश जन्मकथा सांगतो तयाचा महिमा वर्णितो आनंदीभाव समर्पितो तुम्हासाठी ।३। सर्व दुःखे दुर कराया तुम्हांसी सुखे द्यावया जन्म घेती गणराया तुम्हां करिता ।४। असतील देव अनेक देवाधीदेव महादेव एक […]