सकाळी उठल की लोक देवाच्या पाया पडतात आणि मी व्हॉटस्ॲपवर कुणाचा संदेश आला, ग्रुप वर काय चाललय, फेसबुकवर किती जणांनी माझ्या फोटोला लाईक दिले, काय आणि किती कंमेट आल्या हे बघतो. रात्री मोबाईल कितीही वेळ वाया घालवीन पण दिवसभर काम करुन थकलेली आई बोलली बाळा पाय दुखतायत दाबतोस का तर मला झोप येते. आईने छोट काम सांगितल की मला कंटाळा येतो. मला माझ्या अपयशाच खर कारण कळल होत. माझ कंटाळा करण, माझा आळशीपणा, माझ फेसबुक, व्हॉटस्ॲप, युटुब्यच व्यसन, आयुष्यतल्या वेळेचा अपमान, अतिहुशारी, अर्थ नसलेली बडबड. खरच मी आता स्वतःच्या नजरेत एका झटक्यात पडालो, माझी गरजच नाही कशाला जन्माला आलो हाच प्रश्न पडला. खरच घरात बसून असलेल्या मला खरतर घरातून बाहेर हकलल पाहिजे. तर आई बाबांच निस्वार्थ प्रेम मिळतय. कर्जाच्या बोझाखाली वाकलेले आणि लवकरच नोकरीपासून निवृत्त होणारे बाबा कधीच काय बोलले नाही. नको आपला भार आई वडलांना मरुया आपण हाच विचार डोक्यात फिरु लागला. […]