‘राणी’ आय मिस यू !
माझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे . शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची . तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची . बैल बारदाना शेतात . अंगणात तुळशी वृंदावन त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे . अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे . संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी […]