आव्हान समुद्र मार्गाने, भूमार्गाने बेकायदेशीर व्यापार रोखण्याचे
ग्राहकांमधील जागृतीचा अभाव हे बेकायदेशीर व्यापार फोफावण्यामागील प्रमुख कारण आहे. काही लोक बँडेड वस्तू परवडत नाही, म्हणून बनावट वस्तू खरेदी करतात. हे प्रकार रोखण्यासाठी आपल्याला पारदर्शक व्यवस्थेची गरज आहे. नागरिकांनी बेकायदेशीर वस्तू चांगली आणि स्वस्त असली तरीही घेऊ नये. आपण अशा वस्तू घेताना जीएसटी क्रमांक असलेले बिल मागणे आवश्यक आहे. कारण यावर जीएसटी दिला जात असेल तर ती वस्तू कायदेशीररित्या देशात आलेली असते. […]