सौंदर्यासक्त ललत
“दंवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा; अवचित गेलीस पेरीत अपुल्या तरल पावलांमधील शोभा” कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी […]