अंगठी बोटातली फेकून गेला
*गझल* *वृत्त :- व्योमगंगा* *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी; स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला ” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी […]