नवीन लेखन...

अपेक्षा तेथे…..

अपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो. […]

मै अकेलाही मजनू था

“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच  सिनिमा , जुनीच  गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत  जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला .  […]

शुभेच्छा बाळाला…

जीवनात सदैव तू पुढे बघून चालशील अडखळलेल्या खड्ड्यांची   जाणीव ठेवुन वागशील कर्तव्यापासून तू कधी दूर नको पळू तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी आसु नको ढाळू सर्व काही मनासारखे होइल अशी अपेक्षा नको धरूस पण तुझ्या आवडी निवडींना कधी नकोस पुरूस संसार हि तारेवरची कसरत नंतर तुला कळेल इतकी ही तडजोड नको करूस कि मन तुझं जळेल माहित आहे […]

रोशन – कलात्मक संगीतकार

आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. […]

आठवणीतील प्रेम

गंध तव केसांचा आजही तसाच येत आहे जरी डोकावतीय रुपेरी छटा त्यात कधीतरी मस्ती आपल्या प्रेमाची आजही तशीच आहे । चाल आपुली जराशी झालीय मंद जरी ऊमेद चालण्याची ती आजही टिकून आहे गजरा केसात माळण्याची हौसही तशीच आहे । फेसाळणारा सागर किनारा आजही तोच आहे सागराच्या लाटांचा आवाज अजूनही तोच आहे प्रेमलाटेतील आवेश तुझा आजही तसाच […]

वेदना

जाणता वेदना जगातील मम वेदनाही विरुन गेली पाहता दुःख या जगीची मम वेदनेलाही शरम आली । होतो कवटाळून मी बसलो लहानशी वेदनाही फक्त माझी वेदना माझ्यहून किती कठोर जगी आहे कुणी भोगलेली । प्रत्येकाचे आहे दुःख वेगळे आहे वेदनाही हर एक निराळी पाहूनी तु सोसलेल्या वेदना खरी वेदना मजला कळाली । — सुरेश काळे मो.9860307752 सातारा. […]

काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?

“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्‍याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्‍याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]

मंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज !

कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे. […]

मित्र व मैत्री

मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. […]

दादर चा जन्म आणि बारसं..!!

मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबईच्या ब्रिटिशपूर्व इतिहासात फोर्ट विभागाव्यतिकिक्त वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नाझगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे, मात्र यात ‘दादर’ कुठेच नव्हतं. मग प्रश्न पडला तो, ‘दादर’ होतं की नाही की असल्यास अगदी नगण्य स्वरुपातील वस्ती होतं, हा..! […]

1 16 17 18 19 20 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..