नवीन लेखन...

प्रेमाची नाही वेगळी कहाणी

नाही ग मी राजा पण तू आहेस माझी राणी आपल्या प्रेमाची नाही वेगळी अशी कहाणी… सांग मला एकदा काय आहे तुझ्या मनी ? जुन्या त्या आठवणींनी नको डोळ्यात पाणी नको होऊस तू दूःखी थोड्याश्या विरहानी प्रेम नाही होणार कमी जरी ढळेल जवानी आपल्या प्रेमाची नाही वेगळी अशी कहाणी… आपण फक्त जवळ बसावं धुंद करेल रातराणी आयुष्य […]

बाळक्रीडा अभंग क्र.१४

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण तो येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान ते असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, इच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करिता,  इतर मनाचे भाव जाणूनी तेच […]

साउथ आफ्रिका-भाग ४

एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत,  न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.  एक गंमत सांगतो, इथे, […]

दशपदी

(मोरोपंतांची क्षमा मागून. अंतिम पंक्ति  त्यांच्याकडून घेतलेली आहे). चुनावीं, मोठी पार्टी म्हणुन् निवडुन् आलो अम्ही सत्ता हातीं घेण्यांसाठी  होती संधी नामी परी, आकडे बहुमताला पडले थोडेसे कमी त्यासाठी कोणां पक्षाची आम्हां हवी होती हमी. विरोधकांची, अपक्ष यांची, म्हणून केली हांजी-हांजी गळास कैसा कोण लागतो, गणितें केली ताजी-ताजी परंतु नाहीं खेळ साधला, सरकार न बनवूं शकलो दात-ओठ […]

बाळक्रीडा अभंग क्र.१३

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण ते,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे ते त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द एक तो,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता तव दृष्टी,  दिसेल कां तयाची धडपड श्रवणदोष तो येण्यापूर्वी,  ऐकून घे तू दु:खी […]

बेजोड तोडी

पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे. […]

माझे आवडते कथा लेखक – आनंद साधले

आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र ) आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत ! त्यांच्या लेखनाबद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू.  […]

पंचपदी

कुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी होती इलेक्शनची अर्जन्सी नाहीं केली पुरती चौकशी आणि अखेरिस झाली फजिती खाशी . – सुभाष स. नाईक

1 3 4 5 6 7 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..