मराठी संगीतकार प्रभाकर पंडित
मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे […]