बहारदार बहार
“सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती; मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती.” कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत: “मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती” ही ओळ तर खास “बहार” रागाचीच आठवण करून देते. बहार रागाची जाती “औडव/षाडव” आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही […]