तीर्थशिरोमणी तीर्थराज अक्कलकोट !
सज्जनहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की, अक्कलकोटचे महत्व आणि माहात्म्य सर्वांना माहित असताना प्रस्तुत लेखकाने या विषयावर एवढे लिखाण का केले असावे ? तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे ? येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे ? याची माहिती व्हावी आणि त्यानुसार आपण अक्कलकोटी आल्यावर वर्तन करावे. या शुध्द हेतूसाठी हे लिखाण केले आहे. […]