नवीन लेखन...

राहिलंच…..

आयुष्य जगतांना खूप काही “राहिलंच” ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं. शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं […]

श्री प्रभादेवी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा – मुंबईचा प्रभादेवी भाग आज जगभरात प्रसिद्ध आहे, तो इथल्या श्री सिद्धिविनायकामुळे. अलम जगातून या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्तगण येत असतात..पण एक गंमत आहे, हा श्री सिद्धिविनायक कितीही प्रसिद्ध झालेला असो वा अगदी परदेशातही प्रतिष्ठापित झालेला असो, तो ओळखला जातो, तो ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणूनच. आपल्या देशातील बहुसंख्य देवता विविध नांवाने […]

मराठी संगीत विश्वातील ‘देव’ अशी ओळख असलेले यशवंत देव

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव म्हणजे मराठी भावसंगीत परंपरेतील ‘देव’ माणूस; शब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते आणि शब्दसुरांचा सांगाती. त्यांच्या मार्गदर्शनाचा परिसस्पर्श लाभावा म्हणून जुन्या-नव्या पिढीचे गायक प्रतीक्षेत असत. जेष्ठ संगीतकार यशवंत देव यांची माहिती. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात […]

सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९२६ रोजी दादर येथे झाला. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग […]

या ‘नावा’चं करायचं काय?

त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं.. नौकाराचे नाव […]

मुंबईची श्री महालक्ष्मी..!!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा या देवी सर्वभूतेषु ‘महालक्ष्मी’रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं. तमाम मुंबईकरांचं […]

सात्विक साधेपण – सुरुची अडारकर

नम्र, साधेपणा, कामाप्रती प्रामाणिकपणा या वैशिष्टय़ांनी सुरुचीची छायाचित्रं खुलतात… अनेक मराठी कलाकारांना शून्यातून यशाच्या शिखरापर्यंत पोहचताना मी पाहिलंय. काहींचा हा प्रवास अगदी वर्षा – दोन वर्षांत झालाय. तर काहींना त्यासाठी बरीच वर्षे खर्ची पाडावी लागलीत. यातील काहीजण अनेक वर्षांच्या अंती अजूनही एका सीमेपर्यंतच पोहोचलेत तर काही या इंडस्ट्रीतूनच बाहेर फेकले गेलेत. या सगळ्यांचा प्रवास पाहता एक […]

इसवी सन १९०० अखेरीस मुंबईत असलेली हिन्दू मंदिरं

मुंबई शहरातील देवतांचा अभ्यास करताना, सन १८९५ साली श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी यांनी इंग्रजीत लिहिलेलं ‘The Hindu Temple of Bombay’ हे पुस्तक मुंबईच्या एशियाटिक सासायटीत हाती लागलं. सन १९०० अखेरीस मुंबईत असलेल्या सर्व महत्वाच्या मंदिरांचा, त्यातील देव-देवतांचा आणि त्या देवळांवर असलेल्या सरकारी किंवा खाजगी मालकीचा अत्यंत सुंदर आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. श्री. […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती ती,  मंद मंद प्रकाश देवूनी अंधकार भयाण असतां,  भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं असूनी ज्योत मिणमिणती,  त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला,  भरपूर पडल्या प्रकाशाचे मेणबत्तीची ज्योत आम्हांला, शिकवी साधे तत्त्व जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

नितळ चंद्रकौंस

आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती “थिटा” आहे, याची नव्याने जाणीव होते. “मुक्तायन” काव्यसंग्रहात, “मी” या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!! “माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी […]

1 2 3 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..