पृथ्वीवरच्या सोशल मिडियाची खबर काही चुगलखोर आत्म्यांनी स्वर्गात पोहोचवली. एक दोन, ए ग्रेड अप्सरांनी नारदाच्या मदतीने लगेच इंद्राचे कान भरले. मानव निर्मित सोई सुविधांचे अनुकरण देवाधिकांनी करण्याविषयी इंद्राच्या मनात थोडी चलबिचल झालीही परंतु, ” स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा दरबारात इफेक्टीव्ह कम्युनिकेशन टुल म्हणून वापर करुन आपण सर्व अप्सरांच्या हलचालींवरही लक्ष ठेउ व सतत सर्वाच्या टचमधे राहू शकु ” या स्वार्थी हेतूने इंद्रानी स्वर्गातल्या सोशल मीडियाला तत्वत: होकार दिला आणि सर्व अप्सरांची मीटिंग बोलावली. […]