नवीन लेखन...

आधुनिक मंगळागौर (१) – गोफ

गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू गोफ नको बाई गोफ नको त्यापेक्षा टिव्ही पाहू गरे घ्या गरे पोटाला बरे नाही खाई त्याची म्हातारी जगे जगली तर जगली आहे तशी चांगली वृद्धाश्रमात राहते बापडी.

भोंडले (2)

अक्कण ओटा चिक्कण ओटा अस्सा ओटा सुरेख बाई ग्रॅनाइटचा असावा अशा ओट्यावरती बाई मिक्सर लावावा अस्सा मिक्सर सुरेख बाई सुमीतच्या मिक्सरमध्ये इडली रवा फेटावा अस्से सुरेख पीठ बाई फ्रिजमध्ये ठेवावे अस्सं पीठ थोडं थोडं इडलीपात्री उकडावं. अश्शा इडल्या सुरेख बाई चटणीसवे वाढाव्या अस्सा बेत सुरेख बाई कष्टांना वाचवतो अश्शा पोळ्या द्वाड बाई टाळाव्या शक्यतो.

साउथ आफ्रिका-शहर जोहानसबर्ग

आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, […]

घाणा (मुलीच्या लग्नाचा) (३)

आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला (नाव) ताईच्या लग्नाचा ।।धृ।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला आधी वंदू कुलदेवीला गजाननाला नमुनी स्मरू आप्त पूर्वजांना …….. ।।१।। आल्या काक्या, आल्या आत्या, मावशी, मामी, ताई आल्या आम्ही घाणा जो भरीला आम्ही घाणा जो भरीला…….।।२।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला पहिली हळद […]

तरुणाईचा मोहर (अविष्कार) : डॉ. निरंजन करंदीकर

निरंजनचा Ph.D. चा संशोधनाचा हा विषय देशातील करोडो मधुमेही रुग्णांना दिलासा देणारा आहे. आज देशातील सात कोटी मधुमेह पिडीत लोकांचे डोळे, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे. या आजारामुळे दरवर्षी असंख्य व्यक्ती बळी पडता आहेत. मधुमेह आजार शोधण्याचे प्रमुख साधन म्हणजे रक्तपेशी मधील ग्लूकोजची तपासणी करणे व ती मर्यादित ठेवणे. नवीन शोधांमुळे डोळ्यातील पाण्यासारखी इतर जैविकद्रव्ये यांची तपासणी करून ग्लूकोजची पातळी ओळखता येते. […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत बघा ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नी काम बरे,  तत्व हे अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करून ती,  यश मिळाले मला….४, […]

सामाजिक शिष्टाचार – संस्थेची माहिती करून घेणे

संस्थेची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय कर्मचारी संस्थेतील अंतर्गत दळणवळण नीट हाताळू शकणार नाहीत. शिवाय कुरियर असो वा पोस्टमन,ग्राहक असो वा मालपुरवठादार, सर्वांना योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील. […]

भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

अरडी ग बाई, परडी, रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची, ही गर्दी फेरिवाल्यांची फेरीवाल्या फेरीवाल्या माल दे, माल दे हा मोल घे मोल ठेवला हातावर, गाडी होती नाक्यावर आता ह्याला शोधू कशी, बाईसाहेब पडतात अशा फशी

पोरकी

आई ग …… तू असतीस तर दारी मोगरा फुलला असता स्वागतकक्षी फुलदाणीमध्ये गेंद टपोरा झुलला असता । हृदयाच्या पायघड्यांवरूनी नेले असते देवघराशी हळदीच्या पाऊलखुणांची उठली असती घरभर नक्षी । मायेच्या नजरेने मजला पुसलें असते गूज कालचे लाज लाजरी नजर हासरी उत्तर देते तुजला त्याचे । ताटा भोवती असती महिरप पाटा खाली असते स्वस्तिक वेढी विरोद्या लग्नचुड्याचे […]

लाघवी गौड सारंग

एकाच कुटुंबातील  असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा “घ्यायचा” म्हणजेच त्या स्वराची “जागा” कशी मांडायची, त्यामुळे तेच […]

1 13 14 15 16 17 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..