जेनेट आणि जेम्स!!
२००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोबत त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, […]