बघून सूर्यपूजा पावन झालो
हांसत आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शुनी चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com