धुळ साचते
धुळ साचते पुस्तकावर,टि.व्ही.वर खिडक्यांवर,दारावर आणि कुलुपावर धुळ करते कब्जा सार्यांवर… किती दिवस झालेत माणसांचा घरात नाही वावर घरमालक मस्त गेलाय फिरायला घर सोडून वार्यावर…. धुळ पसरते चादर सार्या वस्तूवर आणि कुणी आलंच तर ठसे उमटणार घरभर ठेवते नजर चोरावर.. धुळंच सांभाळते सारं घर तुम्ही घरी नसल्यावर… — श्रीकांत पेटकर (मागील वर्षी आजच्या दिवशी.. १०/१०/२०१७ला केलेली कविता […]