उत्सव माझ्या कवितेचा
हे असेच मी बनावे.. नी असेच मी घडावे.. शब्दांनी ही रे माझ्या, माणसासाठीच लढावे. विष प्यावे अन शंकर व्हावे, शब्द माझे पैगंबर व्हावे.. फकिरा लिहावी इथे साठे नी शब्दांनीच आंबेडकर व्हावे.. आगरकर सुधारक हे दिवाने यावे, खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे.. जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे, कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे.. पाजावे नाथाने गाढवास काशीचे […]