संस्कारमय मन
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते, उचलून त्यास घ्यावे शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात त्या साथ न मिळता, खालती कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com