महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ
‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव ‘अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. […]