एका मनाचे हे भाग
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या त्या भागावरी, वेष्टण शरिराचे अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे ते स्वभाव, सारखेच असती फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती…३, अगणीत ती मनें, कोठे नसे फरक अनेक ती बनली, जनक तिचा एक….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com